Popis: |
प्रस्तुत संशोधन लेख हे "सोलापूर शहरातील गड्डा यात्रा- एक भौगोलिक अभ्यास" या विषयावर आधारित आहे. या संशोधन लेखामध्ये सोलापूरमधील गड्डा यात्रेदरम्यान येणाऱ्या पर्यटकांच्या व्यवस्थापनेचा अभ्यास करून समाधान निर्देशांक काढण्यात आला आहे. याचा अभ्यास करताना पर्यटकांकडून १०० अनुसूची भरुन घेण्यात आली. पर्यटकांच्या निवास व्यवस्था, वाहतूक व्यवस्था, भोजन व्यवस्था, स्थानिक लोकांचे सहकार्य, दर्शन रांगेची व्यवस्था, सुरक्षा व्यवस्था, स्वछता, पार्किंग व्यवस्था इ. व्यवस्थापनाचा अभ्यास केला आहे. यामध्ये पर्यटकांनी दर्शन रांगेच्या व्यवस्थेला जास्त पसंती दिली असून सर्वात कमी पसंती ही निवास व्यवस्थेला दिली आहे. सोलापुर एक पर्यटन स्थळ निर्माण होत असून चांगल्या प्रकारच्या सेवासुविधा पुरविण्यावर शासनाने भर दिले पाहीजे. उपलब्ध माहितीनुसार रस्त्यांची दुरावस्था व प्रदूषण ही एक मोठी समस्या असून शासनाने याविषयी वेळ निघून जाण्यापूर्वी उपाययोजना आखले पाहिजे.  |